रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखरेखीच्या कामांसाठी रविवारी (१९ मार्च) मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.
रविवारी हार्बर मार्गावरून जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान मेगा ब्लॉक असणार नाही.