बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. राजीव हे राज कपूर यांचे सर्वात छोटे चिरंजीव होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज (९ फेब्रुवारी) सकाळी निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहचले होते.
मंगळवारी संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी रणबीर कपूरने खांदा दिला होता. त्यांच्या अंत्ययात्रसाठी बॉलिवूडमधील अनेक जण उपस्थित होते
राजीव यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी या दु:खाच्या समयी स्वत:ला सावरत अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
राजीव कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आणि कपूर कुटुंबीयांमधील अनेक सदस्य तिथे हजर होते. करिश्मा कपूर, रणबीर कपूर, शाहरुख खान, आलिया भट्ट, तारा सुतारिया यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा कपूर कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं आहे. काही महिन्यांपूर्वी ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं तर आता राजीव कपूर यांचं निधन झालं.
या दु:खाच्या समयी रणबीर कपूरने संपूर्ण परिस्थिती हाताळत आपल्या काकांचे अत्यंविधी पार पाडले.
नीतू कपूरने इंस्टाग्रामवर सर्वात आधी राजीव कपूर यांचा फोटो शेअर करुन त्यांच्या निधनाची बातमी दिली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला होता.
रिपोर्ट्सनुसार राजीव कपूर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात देखील नेण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. राजीव कपूर हे ५८ वर्षांचे होते.
राजीव कपूर यांच्या निधनाच्या बातमीनंतर बॉलिवूड अनेक कलाकारांना त्यांंना सोशल मीडियावरुन देखील श्रद्धांजली अर्पण केली.