जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान अशी ओळख मिळवलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा मैदान भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी सज्ज झालंय.
खेळाडूंच्या सरावासाठी मैदानावर खास सोय करण्यात आलेली आहे
या स्टेडीयमवर एकावेळी एक लाखापेक्षा जास्त प्रेक्षक मॅच पाहू शकतात. मेलबर्नच्या मैदानाला मागे टाकत मोटेराने जगातील सर्वात मोठ्या मैदानाचा बहुमान आपल्या नावे जमा केला आहे.
सर्व सुखसोयींनी सज्ज अशा या मैदानात खेळाडूंना सरावासाठी मैदानाच्या आत जीम व इतर सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात मोटेरा मैदानावर सामना पाहण्यासाठी ठराविक संख्येने फॅन्सना परवानगी देण्यात आलेली आहे.
आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय
By मुंबई तक
30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक
By मुंबई तक
चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं?