अनुष्का शर्माला येतेय विराट कोहलीची आठवण; फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई तक

सेलिब्रिटी कपलपैकी एक असलेलं जोडपं म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. दोघांचे सोबतचे फोटोही व्हायरल होतं असतात.

सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

अनुष्का शर्मा चकदा एक्स्प्रेस चित्रपटाच्या शुटिंगसाठी ब्रिटनमध्ये गेलीये आणि तिने तेथूनच विराट कोहलीसाठी खास पोस्ट केलीये.

ब्रिटनमध्ये असलेल्या अनुष्का शर्माला विराट कोहलीची आठवण येतेय आणि तिने तिच्या भावना विराटसोबतचा फोटो शेअर करून व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीच्या आठवणीत लिहिलेल्या पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे.

अनुष्का शर्मा म्हणतेय की, हे जग खूप प्रकाशमान, आकर्षक आणि खूप आनंददायी वाटतं, जेव्हा मी इथे असता. किंवा या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये बायो बबल मध्ये असता. पतीच्या आठवणीतील पोस्ट', असं अनुष्का शर्माने म्हटलंय.

अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहली सोबतचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहिली आहे.

अनुष्का शर्मा, विराट कोहली फोटो/इन्स्टाग्राम