Wrestling : कुस्तीसाठी मोठा दिवस : पैलवानांच्या मानधनात तीन पट वाढीची घोषणा

मुंबई तक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांसाठी घोषणांचा पाऊस पाडला.

राज्यात मिशन ऑलिम्पिकची सुरुवात करणार. खेळाडूंना मदत करणार

राज्यात ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्यांना फक्त ६ हजार रुपये मानधन दिलं जातं. ते वाढवून २० हजार रुपये करण्याचा निर्णय.

हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद यांना ४ हजार रुपये मानधन दिलं जातं. ते १५ आता हजार रुपये देण्याचा निर्णय.

अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडुंना ६ हजार रुपये मानधान दिले जाते. त्यांना आता २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय.

वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार रुपये मानधन दिलं जातं. ते तीनपट वाढवून म्हणजेच साडे सात हजार रुपये देण्याचा निर्णय.