J.P. Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 'दर्गा'मध्ये; चादरही चढवली

मुंबई तक

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आज चंद्रपूर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी त्यांचं स्वागत केलं.

भाजपच्या मिशन १४४ अंतर्गत राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या नियोजनसाठी नड्डा यांचा हा दौरा होता.

या दौऱ्यात चंद्रपुरमध्ये नड्डा यांची जाहीर सभाही पार पडली.

जे. पी. नड्डा यांच्या सभेला मोठी गर्दी जमली होती.

यावेळी जे पी नड्डा यांनी जाहीर सभास्थळी असलेल्या बाबतुल्लाशाह दर्ग्याला भेट दिली.

त्यावेळी जे.पी. नड्डा यांनी मजारवर चादरदेखील चढवली.