...अन् विराट कोहलीसाठी सूर्यकुमार बनला फोटोग्राफर, बघा काय घडलं?

मुंबई तक

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने कौतुकास्पद कामगिरी केली.

भारताने श्रीलंकेचा 3-0 अशा फरकाने पराभव करत मालिका आपल्या नावे केला.

या मालिकेत विराट कोहलीने नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत लक्ष वेधून घेतलं.

कोहलीनं 110 चेंडू खेळताना 13 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने नाबाद 166 धावांची खेळी केली.

कोहलीच्या या खेळीनंतर त्यांचा एक चाहता सुरक्षेची चौकट मोडून मैदानात शिरला.

चाहत्याने विराट कोहलीचे पाय धरले. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, सूर्यकुमार हे ही त्याठिकाणी होते.

कोहलीसोबत त्याला फोटो काढायचा होता, यावेळी सूर्यकुमार यादवने त्यांचे फोटो क्लिक केले.

सूर्यकुमार यादव कोहलीच्या चाहत्यासाठी फोटोग्राफर बनल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.