Ira Kha : आमिर खानच्या लेकीची पुणेकर सासू, साखरपुड्यात सगळ्यानाच नाचवलं

मुंबई तक

आमिर खानची लेक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा साखरपुडा अलिकडेच झाला.

नुपूर शिखरेसोबत साखरपुडा झाल्यानंतर आयरा खान आता पुण्याची सून झालीये.

आयरा खानने तिच्या साखरपुड्यातील फोटोही शेअर केलेत.

महत्त्वाचं म्हणजे तिच्या पुणेकर सासूचं आयरा खाननं कौतुक केलंय.

साखरपुड्याच्या दिवशी सगळ्यात जास्त आनंदी कोण होतं, असं म्हणत आयरा खानने सासू प्रीतम शिखरे यांचे फोटो शेअर केलेत.

पिंक कलरच्या साडीत आयरा खानची सासू प्रीतम शिखरे या साखरपुड्यात खूपच धमाल करताना दिसल्या.

प्रीतम शिखरे यांनी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या साखरपुड्यात सगळ्यानाच नाचवलं.

आयरा खानने प्रीतम शिखरे यांचे कॅमेऱ्यात कैद झालेले क्षण शेअर केलेत.

साखरपुड्यात सगळ्यात जास्त आनंदी व्यक्ती या होत्या, असंही आयराने म्हटलंय.

आयरा खान-नुपूर शिखरे फोटो इन्स्टाग्राम