प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूरचे स्पष्टीकरण, म्हणाली मी काय मशिन आहे?

मुंबई तक

काही दिवसांपूर्वी करीना कपूर खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला.

फोटोमध्ये करीना पती सैफ अली खान आणि एका मित्रासोबत पोज देताना दिसली होती. या फोटोत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या 'बेबी बंप'ने.

फोटोमध्ये करीनाचे पोट पाहून ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होत्या. या अफवांवर आता अभिनेत्री उघडपणे बोलली आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना करीना म्हणाली सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या फोटोंबद्दल लोक काय विचार करतात हे तिला माहीत आहे.

करीना कपूरने तिच्या व्हायरल फोटोच्या आणि गर्भधारणेच्या बातम्या एका इन्स्टा पोस्टद्वारे फेटाळून लावल्या आहेत. ती म्हणाली हा पास्ता आणि वाईनचा हा परिणाम असेल.

करीना कपूर म्हणाली, 'तो फोटो एडिट करण्यात आला होता. माझे पोट असे दिसले आणि मला वाटले अरे देवा हे काय आहे? कदाचित ते वाइन आणि पास्तामुळे असेल. मला माहित नाही?

करीनाने कबूल केले की हे त्रासदायक आहे. एखाद्या महिलेचे वजन वाढते की लोक लगेच म्हणतात प्रेग्नंट आहे का?.

लोक चर्चा करत असतात ती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे? ती पुन्हा बाळाला जन्म देतीये? मी काय यंत्र आहे का? असे करीना म्हणाली.