लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी 'मूक मोर्चा'; नवनीत राणाही उतरल्या रस्त्यावर

मुंबई तक

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात लव्ह जिहाद/धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीने डोकं वर काढलंय.

वेगवेगळ्या शहरात या मागणीसाठी आंदोलनं मोर्चे होत असून, अमरावतीतही मोर्चा काढण्यात आला.

अमरावतीमध्ये रविवारी हिंदू संघटनांच्या वतीने धर्मांतर /लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला.

अमरावतीत काढण्यात आलेल्या हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चात अमरावतीच्या खासदार नवनीत राणाही सहभागी झाल्या.

अमरावती शहरातील राजकमल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

श्रद्धा वालकरसारख्या घटना टाळण्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे, असं मोर्चात सहभागी झालेल्यांचं म्हणणं होतं.