Rishabh Pant : क्रिकेटचे खरे बाजीगर! रस्ते अपघातानंतर केलं यशस्वी कमबॅक

मुंबई तक

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यामुळे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

Photo: Social Media

या अपघातामुळे रिषभ पंतच्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

श्रीलंकेचा फिरकीपटू कौशल लोकुराची हा देखील रस्ता अपघातात जखमी झाला होता. मात्र त्यानंतरही तो मैदानात परतला होता. २०१२ मध्ये त्याने पुनरागमन केलं आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू साईराज बहुतुले हेही एकदा कार अपघातात जखमी झाले होते. पण त्यानंतर ते मैदानात परतले आणि भारताकडून क्रिकेटही खेळले.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचाही २०१८ मध्ये रस्ता अपघात झाला होता. मात्र या अपघातातून सावरल्यानंतर शमीने क्रिकेटच्या मैदानावर शानदार पुनरागमन केले.

भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनीही कार अपघातात डोळा गमावल्यानंतरही क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन केले होते.