UPI पेमेंट करताना 'यापासून' राहा सावध

मुंबई तक

UPI पेमेंट करताना छोटीशी चूकही आपल्याला प्रचंड महागात पडू शकते.

मागील 2-3 वर्षांमध्ये UPI पेमेंटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

स्मार्टफोन जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या हाती आल्याने ऑनलाइन पेमेंटमध्ये खूपच वाढ झाली आहे.

मात्र, UPI पेमेंट करताना थोडासाही हलगर्जीपणा केल्यास आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

नुकतंच UPI पेमेंट दरम्यान फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे.

UPI पेमेंटसाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण एक लक्षात ठेवा की, एकापेक्षा अधिक अॅपचा वापर आपण करु नये.

कारण सध्या फसवणूक करण्याच्या वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत.

काही जण आपल्याला फोन करतात आणि आपल्याकडे आपल्या अकाउंटशी निगडीत माहिती मागतात. अशावेळी आपण आपल्या अकाउंटबाबत कोणतीही माहिती देऊ नका.

जर आपण चुकूनही आपली माहिती शेअर केली तर तुम्हाला खूपच नुकसान होण्याची शक्यता आहे.

सर्व UPI पेमेंट अॅपमध्ये स्क्रीन लॉक सुविधा देण्यात आली आहे. यासाठी योग्य पिन, पासवर्ड किंवा पॅटर्नद्वारे आपण आपलं अॅप सुरक्षित ठेवू शकतात.