सैफ अली खानच नाही 'या' अभिनेत्यांनाही साकारला आहे रावण
मुंबई तक
आदिपुरूषचा टिझर समोर आला आहे, या टिझरमध्ये रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. त्याच्यावर टीका होते आहे. अशात सैफ एकटाच नाही ज्याने रावण साकारला आहे. इतरही अभिनेते आहेत
रामायण मालिकेत अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण हा अजरामर झाला आहे. अजूनही त्यांच्या रोलची चर्चा होते
दक्षिणेतले ज्येष्ठ अभिनेते एन. टी. रामाराव यांनी एका सिनेमात रावणाची भूमिका साकारली आहे
भारत एक खोज या मालिकेत ओम पुरी यांनी रावणाची भूमिका साकारली
अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यांनीही रावणाची भूमिका केली आहे
अभिनेता शाहबाज खान यांनीही रावणाची भूमिका साकारली आहे
अभिनेते सुरेंद्र पाल यांनीही रावणाचा रोल केला आहे
अभिनेता मुकेश ऋषीनेही रावणाची भूमिका केली आहे
रामायणावरच्या एका मालिकेत रावणाच्या भूमिकेत अभिनेता तरूण खन्ना