Maharashtra Kesari : वडील शेतकरी अन् मुलगा महाराष्ट्र केसरी; कोण आहे शिवराज राक्षे?

मुंबई तक

महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चीतपट करुन शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली 

शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. 

शिवराज राक्षे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो.

शिवराज हा पुण्यातील खेड तालुक्यातील असला तरी तो नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो.

शिवराज राक्षेने कनिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

अंतिम सामन्याआधी बोलताना वडील शेतकरी आणि घरचा दुधाचा व्यवसाय असल्याचं शिवराज राक्षेने सांगितलं होतं.