'खाऊन महाराष्ट्राची भाकरी, गुजरातची...', शिंदे गटाच्या वर्मावर पहिल्याच दिवशी बोट

मुंबई तक

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झालंय.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे गटाच्या वर्मावर बोट ठेवलं.

'50 खोके एकदम ओके'चे बॅनर झळकावत विरोधकांनी दिल्या सरकारविरोधात घोषणा.

महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं.

'खाऊन महाराष्ट्राची भाकरी, गुजरातची करतात चाकरी' अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर दिल्या.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनात अजित पवार, अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते.