Pune : विद्यार्थ्यांसमोरच शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना लावला फोन

मुंबई तक

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची भूमिका शरद पवारांकडे मांडली.

शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत थेट एकनाथ शिंदे यांना फोन लावला.

पवार शिंदेंना म्हणाले, 'स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी माझ्याकडे काही प्रश्न घेऊन आले.'

'माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली असून, या प्रश्नावर बैठक झाली पाहिजे. सामोपचाराने प्रश्न मार्गी लागला पाहिजे.'

'विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी आणि मी. तसेच तुमच्याकडील काही लोक अशी एकत्रित बैठक आपण सह्याद्रीवर घेऊयात.'

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'हो साहेब. तुमची तब्येत कशी आहे.'

त्यावर शरद पवार म्हणाले, 'ठीक आहे.' अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली.