Bigg Boss 16 : सुरभी ज्योती खरंच 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार आहे का?

मुंबई तक

सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 16 शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चा प्रीमियर होणार आहे. अनेक सेलिब्रिटींचे प्रोमो रिलीज झालेत. यात निम्रत कौर आहलुवालिया आणि सुंबुल तौकीर खान यांच्या नावाचा समावेश आहे.

बिग बॉस १६ मध्ये अभिनेत्री सुरभी ज्योती सहभागी होणार असल्याचंही बोललं जातं होतं.

यावर अभिनेत्री सुरभी ज्योतीने स्वतःच खुलासा केला आहे.

सुरभी ज्योतीने बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार की नाही, याबद्दल ट्विट करून सांगितलंय.

सुरभी ज्योती म्हणाली, 'मी बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार नाही', असं तिने स्पष्ट केलंय.

सुरभी ज्योती बिग बॉस १६ मध्ये दिसणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली होती.

इतकंच नाही, तर सुरभी ज्योतीला सलमान खान होस्ट करत असलेल्या या शो साठी मोठी रक्कम मिळणार असल्याचीही चर्चा होती.

surbhi jyoti Photo_Instagram